गावाकडची ड्रोनची भिती थेट बिग बाॅसमध्ये

सुरज चव्हाण याने सांगितली गावाकडची ड्रोनच्या घिरट्याची दहशत

महाराष्ट्रात बहुतेक गावांमध्ये रात्रीचे फिरणारे ड्रोन हा चिंतेचा व दहशतीचा विषय झाला आहे. सामान्य माणूस रात्री पडणाऱ्या ड्रोनच्या झाकझुक प्रकाशाने दहशतीखाली असतानाच आता हे ड्रोन चोरटे वापरत असल्याची चिंता थेट बिग बाॅस या सध्या गाजत असणाऱ्या कलर मराठीच्या शोमध्ये चर्चेत आली.
बिग बाॅस मध्ये गावाकडचे पोर असणारे सुरज चव्हाण याने हे वास्तव शोमध्ये सांगून गावाकडे किती अडचणी येतात याचा प्रत्ययच समोर मांडला. सुरज चव्हाण, पंढरीनाथ (उर्फ पॅडी), अंकिता, वर्षा उसगावकर आदी कलाकार चर्चा करीत होते. त्यावेळी सुरज याने सांगितले की, आमच्या गावाकडे रात्रीचे ड्रोन फिरते. चोरटे त्याच्या माध्यमातून गावात टेहळणी करतात. त्यावेळी अंकिता त्याला म्हणाली, तुम्ही खालून त्याला दगडे मारता का ? त्यावर सुरज याने दिलेले उत्तर महत्वाचे आहे. तो म्हणाला, ड्रोन उंचावर असते आणि त्याची फक्त झाकझुक करणारी लाईट दिसते. पण रात्रीचे ड्रोन हा विषय आता थेट बिग बाॅस मध्ये चर्चेत आल्याने गावातील ही चर्चा पुन्हा एकदा प्रशासनाने गांभिर्याने घेण्याची मागणी होत आहे.