पाथर्डी येथील घटनेने हळहळ…
पाथर्डी, ता. १८ : पाथर्डी शहराजवळ असणाऱ्या वनदेव डोंगरालगत झालेल्या भिषण अपघातात दोन सख्या चुलत भावांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी रात्री उशिरा घडली.
भगवान मुरलीधर कुटे (वय ३५) व योगेश शिवाजी कुटे (वय २६) राहणार देवी धामणगाव (ता. पाथर्डी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी घटनेतील दोघांकडे असलेली सायकल व मोटारसायकल पडून असल्याचे पोलिसांना आढळून आले. मंगळवारी रात्री आपल्या सायकलवरून भगवान कुटे हा धामणगाव कडे जात होता. तर योगेश कुटे धामणगाववरून पाथर्डीच्या दिशेने दुचाकी घेऊन जात होता.वनदेव डोंगराच्या घाटीतील उतावरावर असलेल्या जुन्या दगड खाणी जवळ अपघात झाला. या मध्ये योगेश कुटे याचा जागीच मृत्यू झाला तर भगवान कुटे याला उपचारासाठी अगोदर पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात व नंतर पुढील उपचारासाठी नगरला दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा आज (बुधवारी) मृत्यू झाला. घटनास्थळी सायकल व दुचाकी पोलिसांना अपघाताच्या स्थितीमध्ये आढळून आली.भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने या दोघांना उडवले की दोघांची आपसात धडक झाली हे समजू शकले नाही. योगेश कुटे याचे पाथर्डीत इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान होते. भगवान कुटे शेतकरी होता.याप्रकरणी पाथर्डी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Previous Articleगावाकडची ड्रोनची भिती थेट बिग बाॅसमध्ये