सविता वाळके, रिद्धी सप्रे व अश्विनी हिरडे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
श्रीगोंदा, ता. २ : अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा प्रवरा पब्लिक, प्रवरानगर येथे स्पर्धा झाल्या.
त्या स्पर्धेमध्ये येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील खेळाडू सविता वाळके हिने १८ वर्षे वयोगटात भालाफेक मध्ये अजिंक्यपद तर गोळा फेक स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले. रिद्धी सप्रे हिने १००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अजिंक्यपद घेतले. तिच्या पाठोपाठ तीची सहकारी अश्विनी हिने याच स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले.
या तिघी खेळाडूंची बालेवाडी (पुणे) येथे दिनांक १९ ते २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
सविता वाळके व रिद्धी सप्रे या दोघी बारावी कला शाखेत शिक्षण घेत आहेत. तर अश्विनी हिरडे एफवायबीए मध्ये शिकत आहे.
खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालिका कल्पना बागुल, क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव हे मार्गदर्शन करीत आहेत.
विजयी खेळाडूंचे महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्ष आमदार बबनराव पाचपुते, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आमदार राहुल जगताप, महावीर पटवा,प्राचार्य महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे,उपप्राचार्य शहाजी मखरे,पर्यवेक्षक झिटे, जिमखाना प्रमुख संजय अहीवले, प्रा. सुदाम भुजबळ यांनी अभिनंदन केले.