श्रीगोंद्यात रयतच्या संकुलांची उद्घाटने
श्रीगोंदा, ता. २८ : कर्मवीर भाऊराव पाटील हे तीन महापुरुषांचे वारसदार म्हणून होते. त्यांच्या जीवनामध्ये आधुनिकता होती. आज रयत शिक्षण संस्थेने कात टाकली आहे. भविष्याकडे नवीन दृष्टिकोनातून पाहनाच,आधुनिकतेचा स्वीकार केला पाहिजे. समाजालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने करावे, अशी अपेक्षा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलातील महादजी शिंदे विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाखांच्या विविध कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभ ऑनलाइन पद्धतीने महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, महात्मा फुले यांनी इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज कडे आरोपींना शिक्षा धरण खोदण्याची असायला हवी. नवीन संकरित वाण निर्माण करतानाच, शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई निर्माण केल्या पाहिजेत अशी मागणी केली होती. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी पाण्यासाठी ‘राधानगरी’ हे धरण तर ‘उद्योगनगरी’ उद्योगांसाठी उभा केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्री असताना जलसंपदा, रोजगार आणि वीजमंत्री म्हणून अत्यंत उत्कृष्ट उपक्रम राबवले, त्यातील भाक्रानांगल धरण, बारमाही पाणी सुविधा आणि वीज निर्मिती व वितरण पॉवरग्रेड निर्माण केले.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी रयत शिक्षण संस्था आधुनिकतेचा स्वीकार करत आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये प्रत्येक शाखा इंट्रॅक्टिव पॅनेल बोर्डने सुसज्ज होईल. खऱ्या अर्थाने आधुनिक शिक्षण देण्याचे कार्य रयतच्या माध्यमातून चालू आहे. येणाऱ्या काळात जेईई, नीट यासारख्या परीक्षांसाठी आदर्श मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविकात जनरल बॉडीचे सदस्य बाबासाहेब भोस यांनी, रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा तालुक्यातील विविध शाखांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य,आमदार बबनराव पाचपुते यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा तालुक्यातील विविध शाखांच्या स्थापने संदर्भातला व महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या स्थापनेचा इतिहास व प्रगतीतील वेगवेगळ्या शहरातील लोकांची योगदान स्पष्ट केले. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही पक्ष भेद विसरून रयतच्या मंचावर एक मुखाने काम करत आहोत आणि करत राहू असा शब्दही दिला.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष एड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख,माजी आमदार राहूल जगताप, राजेंद्र नागवडे,राजेंद्र फाळके, घनश्याम शेलार , आण्णासाहेब शेलार, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, मनोहर पोटे, टिळक भोस,महादजी शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप भुजबळ, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गीता चौधरी उपस्थित होते.
सूत्रसंचालन मंजुश्री धीवर, प्रा. शरद साळवे व प्रा. शहाजी मखरे यांनी केले.आभार प्राचार्य डॉ.महादेव जरे यांनी मानले.