संजय आ. काटे
अहिल्यानगर जिल्ह्यात भलेही कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याने गाळपात आघाडी घेतली असली तरी, ऊस दरात मात्र सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने बाजी मारली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ठराविकच कारखान्यांची ऊस दरातील दादागिरी मोडीत काढीत नागवडे कारखान्याने आत्तापर्यंत तरी बाजी मारली आहे. कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दोन दिवसांपुर्वी यंदाच्या हंगामात उसाला प्रतिटन ३०५० रुपयांचा दर देण्याची घोषणा करीत अनेकांची हवा गुल केली. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळतोय ही सर्वात चांगली बाब असतानाच, नागवडे कारखान्याने त्यांची विश्वासहर्ता कायम टिकवली आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांचे ऊस दर आणि ३० जानेवारीपर्यंत झालेले गाळप असे….
अगस्ती सहकारी साखर कारखाना (रु. २७००) लाख २४ हजार ५३६ मे. टन
अशोक सहकारी साखर कारखाना श्रीरामपुर (रु.२७००) २ लाख ९४ हजार ६५० मे.टन
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर, नेवासा (रु. २७००) ५ लाख ९९ हजार ७२० मे.टन
पदमश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, राहाता (रु.३०००) ४ लाख ७०० मे.टन
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, संगमनेर(रु. २८००) ५ लाख ४१ हजार १४० मे.टन
सहकार महर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कोपरगांव ( रु. २८००) ३ लाख ४२ हजार ३०३ मे.टन
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, कोळपेवाडी (रु. २८००) ४ लाख १ हजार ८६० मे. टन
इंडीकॉन डेव्हलपर्स प्रा लि. (अंबालिका) कर्जत (रु. २८००) ९ लाख ८१ हजार ६५० मे.टन
श्री साईकृपा शुगर अंण्ड अलाईड इंडस्टीज लि.हिरडगांव (रु.३०१०) ४ लाख ९७ हजार ३९५ मे.टन
सहकार महर्षीं शिवाजीराव नागवडे श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना,श्रीगोदा फॅक्टरी (रु. ३०५०) ३ लाख ६१ हजार ८५० मे.टन
श्री साईकृपा शुगर अँण्ड अलाईड इंडस्टीज लि. (साजन शुगर )(रु. ३११०) ५३ हजार ९११ मे.टन
श्री वृध्देश्वर सहकारी साखर कारखाना लि.अदिनाथनगर (रु. २७२३) १ लाख ६० हजार ४३० मे.टन
केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि.शेवगांव (रु. २७००) ७९ हजार ७६० मे.टन
कृषीनाथ ग्रीन एजन्सी लि.माळकुप पारनेर (सोपानराव धसाळ) (रु. २७००) १ लाख १९ हजार ८४६ मे.टन
मुळा सहकारी, साखर कारखाना लि.सोनई ता.नेवासा (रु. २८००) ४ लाख ६१ हजार ७२० मे.टन
गंगामाई इंडस्ट्रीज लि. ता.शेवगांव (रु. २७००) ६ लाख २६ हजार ७९० मे.टन
श्री.क्रांती शुगर अँण्ड पॉवर लि.देवीभोयरे ता.पारनेर (रु. २७००) २ लाख ३२ हजार ३२० मे.टन
श्री.गजानन महाराज (युटेक) शुगर प्रा लि.कौटेमलकापुर (माहिती अप्राप्त)
प्रसाद शुगर अंण्ड अलाईड लि.सडे वांबोरी रोड ता.राहुरी (रु. २८००) ३ लाख ३१ हजार १९० मे.टन
श्री गणेश सहकारी साखर कारखाना लि.गणेशनगर (रु. २८००) १ लाखर १९ हजार ९०० मे.टन
स्वामीसमर्थ शुगर अँण्ड अॅग्रो इंडस्ट्रोज लि.नेवासा (रु. २८००) ४६ हजार ८४५ मे.टन.