श्रीगोंदा नगरपालिकेची अनास्था ….
संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. २३ : श्रीगोंदा शहरातील पहिले क्रिडासंकुल धूळखात पडून असतानाच पालिकेने पाच वर्षांपुर्वी दिमाखात सुरु केलेले एक कोटी ३ लाख रुपयांचे खेळाचे मैदानाचे कामही अर्धवट पडले आहे. त्या भागात अतिक्रमण असल्याने हे काम होवू शकत नसल्याने नगरपालिका प्रशासन हतबल दिसत आहे. तेथेच असणारी अभ्यासिका केंद्राची इमारतही अर्धवट असतानाच आता क्रिडासंकुलही रखडल्याने यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
नेमके कुणाचे चुकतेय….
शहरातील बाह्यवळण रस्ता व पारगाव रस्ता या मोक्याच्या जागी असणाऱ्या दोन अर्धवट इमारती बांधकामे लोकांचे स्वागत करतात. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना गोड स्वप्ने दाखवून नगरपालिकेने अभ्यासिका केंद्राच्या इमारतीचे काम काही वर्षांपुर्वी हाती घेतले होते. पण भिंती उभ्या राहिल्या आणि तांत्रिक अडचणीच्या फेऱ्यात ही इमारत सापडली. चौकशीचा फार्स झाला पण त्याचे नेमके पुढे काय झाले हे कुणालाही समजण्यापुर्वीच सदर इमारतीचा अनाधिकृत ताबा काही लोकांनी घेतला. इमारतीसह आसपासची जागाही मालकीची केली. त्यामुळे अभ्यासिका केंद्र रहिवासी ठिकाण झाले.
त्याच इमारतीशेजारी नगरपालिकेने विशेष निधीच्या माध्यमातून क्रिडासंकुल (खेळाचे मैदान) विकसीत करण्यासाठी प्रस्ताव टाकला. राज्य सरकारने तो मंजूर करीत त्याला एक कोटी ३ लाखांचा निधीही दिला आणि काम सुरु झाले. एक वर्षात हे संकुल खेळांडूसाठी तयार होणार होते. पण आता जवळपास पाच वर्षे झाली मात्र ते कामच पुर्ण नाही. अर्धवट अवस्थेत रखडलेल्या या कामाकडे ना पालिकेचे लक्ष आहे ना भावी नगराध्यक्ष वा आमदारांचे लक्ष आहे. त्या भागात अतिक्रमण असल्याने कामासाठी वहाने आत जाण्यासाठी रस्ताच नसल्याचे निमित्त असल्याचे सांगितले गेले.
क्रिडासंकुलाच्या इमारतीत अशा असतील सोयी-सुविधा….
एकुण जागा ३० गुंठे
जाॅगिंग ट्रॅक, इन-डोअर बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, बास्केटबाॅल