Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Nagar Today
अनुराधा नागवडे यांच्याकडे सर्व पर्याय खुले संजय आ. काटे Shrigonda Political News : श्रीगोंदा,ता. २२ : दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे ( Shivajirao Nagwade) यांनी आयुष्यभर संस्काराचे आणि संघर्षाचे राजकारण केले. राजकारणात सगळे माफ असतानाही त्यांनी संस्काराची चौकट कधी सोडली नाही. आता त्यांच्या सुष्ना अनुराधा राजेंद्र नागवडे ( Anuradha Rajendra Nagwade) विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. महायुतीची उमेदवारी त्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करीत असतानाच, वेळप्रसंगी सगळी तयारी ठेवा, आता माघार नाही असा संदेश कार्यकर्त्यांना मिळाल्याचे समजते.साठ वर्षांपेक्षा जास्त काळ नागवडे कुटुंबीय राजकारण व सहकारात आहे. जेष्ठ दिवंगत नेते शिवाजीराव बापु नागवडे यांनी त्यांचा काळ कसा गाजविला याची उदाहरणे आजही तरुणांपुढे आहेत.…
महाविकास आघाडीकडून कोण ? राहूल जगताप की साजन पाचपुते संजय आ. काटे Shrigonda Political News श्रीगोंदा, ता. २१ : दहा वर्षांपुर्वी राहूल जगताप (Rahul Jagtap) या तरुण चेहऱ्याला श्रीगोंद्याचे आमदार करण्याची किमया शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती. आता पुन्हा एकदा जगताप महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशिल असले, तरी त्यांना यावेळी साजन पाचपुते (Sajan Pachpute) या तरुण चेहऱ्याचा मोठा अडसर आहे. शिवसेनेचा (उध्दव ठाकरे गट) भक्कम पाठींबा दिसतोय. परिणामी उमेदवारीसाठी तुतारी वाजणार की मशाल पेटणार यावरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झाली आहे.महाविकास आघाडीत भाजपाचे आमदार असल्याने उमेदवारी त्यांच्याकडेच जाईल असे चित्र असले तरी राष्ट्रवादीच्या अनुराधा नागवडे याही उमेदवारीसाठी प्रयत्नशिल आहेत.…
विक्रमसिंह पाचपुतेच उमेदवार संजय आ. काटेShrigonda Political News श्रीगोंदा, ता. २० ऑगस्ट २०२४ : विधानसभेतील अनुभवी आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pacchpute) यांची तब्बेत काही वर्षात बिघडली आहे. यंदाही तेच उमेदवारी करतील असा दावा त्यांचे कुटुंबिय करीत असले तरी त्यांचे थोरले पुत्र विक्रमसिंह हेच त्यांचे वारसदार ठरल्याचे दिसते. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या ते मर्जीत असल्याने पक्षही त्यांच्याकडेच महायुतीचा उमेदवार पाहत असून त्यांना तयारीसाठी हिरवा कंदील मिळाला आहे.१९८० पासून प्रत्येक विधानसभा निवडणूक लढवून राज्याच्या राजकारणात वेगळा दबदबा निर्माण केलेले आमदार बबनराव पाचपुते यावेळी कदाचित थांबतील असे दिसते. अर्थात दरवेळी त्यांनी वेगळा धक्का दिला असल्याने कुणीही खात्रीपुर्वक सांगू शकत नसले तरी त्यांची तब्बेत…
कल्याणकारी योजनामधून जिल्ह्याच्या विकासला गती-ना.विखे पाटील ७७ वा स्वातंत्र्य दिन समारोह, गुणवंतांचा सन्मान अनेक लोकोपयोगी निर्णयांतून सर्वसामान्यांना विकास साधण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. विविध कल्याणकारी योजना गतीने व प्रभावीपणे राबवुन जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे.तिर्थक्षेत्र पर्यटन आणि औद्यगिक विकासातून रोजगार निर्मिती हाच प्राधान्यक्रम आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्ह्यातील १लाख७३ हजार ९९७ पशुपालकांना ९६ कोटी १९ लाख रुपयांचे दुध अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, ‘मुख्यमंत्री माझी…
Sanjay sawant संजय सावंत, कार्याध्यक्ष, राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा संजय सावंत, कार्याध्यक्ष, राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा पटनोंदणी ‘आधार केंद्रीत‘ नको विद्यार्थी केंद्रीत हवी… अन्यथा राज्यभर आंदोलन करणार – संजय सावंत, कार्याध्यक्ष, राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा पोरं शाळेत.. आधार नाही.. शिक्षक नाही.. अहमदनगर, ता. १६. गतवर्षी 30 सप्टेंबर 2023 च्या पटावर शिक्षण विभागाकडून संच मान्यता ऑनलाइन पद्धतीने करण्यात आलेली आहे. सदर संच मान्यतेमध्ये ज्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड आहे किंवा व्हॅलिड आहे अशांनाच गृहीत धरले आहे. पण आधार व्हॅलिड नसलेले विद्यार्थी व आधार नसलेले विद्यार्थी तसेच उशीरा आधार कार्ड नोंदणी केलेले विद्यार्थी यांना मात्र संच निश्चिती मधून वगळण्यात आले आहे. म्हणजेच जे…
shrigonda onion news श्रीगोंदा : तालुक्यातील कांद्याची वाढती लागवड यंदाही कायम राहणार आहे. गेल्यावर्षी तालुक्यातील दोन बाजार समितीत तालुक्यासह आसपासच्या जिल्ह्यातून सव्वापाच लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. पारगाव येथील चैतन्य बाजार समितीत श्रीगोंदा बाजार समितीच्या तुलनेत जास्त आवक झाली. श्रीगोंद्यासह आसपासच्या तालुक्यात कांद्याची मोठी लागवड होते. एकट्या श्रीगोंद्यात काही गावांमध्ये कांद्याचेच पिक घेतले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अनेक गावांमध्ये कांद्याच्या दराबाबत सत्ताधाऱ्यांवर असणारी नाराजी त्यामुळे थेटपणे पुढे आली. पुर्वी तालुक्यात श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकटीच शेतकऱ्यांची होती. पण आता तीला स्पर्धा खाजगीची झाली आहे. पारगावफाटा येथे चैतन्य या खाजगी बाजार समितीने काही वर्षात कात टाकली आहे. विशेष…