Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Nagar Today
आम आदमी पार्टीचे राजेंद्र नागवडे यांची भूमिका श्रीगोंदा, ता. १६ : लोकशाहीत सत्तेचे नेहमीच विकेंद्रीकरण व्हावे म्हणजे लोकशाही अजून प्रबळ होईल. त्यासाठी सत्तेची विभागणी महत्वाची आहे. ज्या नेत्यांकडे साखर कारखाने आहेत अशा श्रीगोंद्यातील नेत्यांनी विधानसभा निवडणूकीत थांबून कारखाने चांगले चालवावेत अशी भूमिका ‘आप’चे प्रदेश संघटन राजेंद्र निळकंठ नागवडे यांनी मांडली आहे. एका व्यक्तीकडे एकच सत्ता केंद्र असल्यास इतरांना संधी मिळतेच आणि त्या व्यक्तीलाही त्या पदाला न्याय देता येतो असे सांगत नागवडे म्हणाले, श्रीगोंद्यात विधानसभा निवडणूक लागण्यापुर्वीच प्रश्न आणि समस्यांची यादीच टाकली जात आहे. सगळेच इच्छूक तालुक्यात आणि मतदारसंघात किती समस्या आहेत व त्या आपणच कशा सोडवू याची आखणी करीत आहेत.…
आमच्यामुळेच तुम्ही दोघे आमदार -राजेंद्र दादांचा पाचपुते-जगताप यांच्यासमोरच दावा संजय आ. काटेश्रीगोंदा, ता. ३ : राहूलदादा तुम्हाला आम्ही आमदार केले आणि बबनरावदादा तुम्हाला गेल्यावेळी मदत केली त्यामुळे तुम्ही आमदार झालात, पण आता या उपकाराची परतफेड करण्याची तुमची वेळ असून यावेळी मला मदत करा असे थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांनी केले.म्हातारपिंप्री ता. श्रीगोंदा येथील एका धार्मिक कार्यक्रमात हे तिन्ही नेते एकत्र आले होते. कार्यक्रम जरी धार्मिक असला तरी श्रीगोंद्यातील नेते हातात माईक आल्यावर संधी सोडत नाहीत. तेथील एका मंदीरात सभामंडप देण्याची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना अगोदर राहूल जगताप म्हणाले, माझ्या हातात कोणतीच सत्ता नाही. पण…
प्रवरानगर येथे जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा संपन्न अहमदनगर , ता. २ :विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे विशेष लक्ष द्यावे. खेळाकडे करिअरची एक वेगळी व शाश्वत संधी म्हणून पहावे असे आवाहन प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.बी बी अंबाडे यांनी केले .प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर येथे Ahmednagar District Athletics Association द्वारे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास ११०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. १४, १६, १८, २० व २३ वर्ष वयोगटासाठी या स्पर्धा झाल्या .या स्पर्धेतील प्रथम दोन क्रमांक प्राप्त खेळाडू १९ ते २२ सप्टेंबर दरम्यान बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याचे सचिव दिनेश…
सविता वाळके, रिद्धी सप्रे व अश्विनी हिरडे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडश्रीगोंदा, ता. २ : अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा प्रवरा पब्लिक, प्रवरानगर येथे स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धेमध्ये येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील खेळाडू सविता वाळके हिने १८ वर्षे वयोगटात भालाफेक मध्ये अजिंक्यपद तर गोळा फेक स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले. रिद्धी सप्रे हिने १००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अजिंक्यपद घेतले. तिच्या पाठोपाठ तीची सहकारी अश्विनी हिने याच स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. या तिघी खेळाडूंची बालेवाडी (पुणे) येथे दिनांक १९ ते २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.सविता वाळके व रिद्धी सप्रे या दोघी बारावी कला शाखेत शिक्षण घेत आहेत.…
विधानसभेला भाजपाला होणार फायदा संजय आ. काटेShrigonda Political Newsश्रीगोंदा, ता. १ : दहा वर्षांपुर्वी नागवडे व जगताप यांचा गट एकत्र आला आणि आमदार बबनराव पाचपुते यांचा विधानसभेत पराभव झाला. त्यावेळी एकी केलेले नेते आता राहिले नसल्याने नागवडे व जगताप यांच्यातील ‘दादां’ना परफेक्ट सल्लागार भेटल्याने दोन्ही गटांचा वाद नुसता विकोपालाच गेला नाही तर त्याचा कधीही भडका होण्याचा धोका आहे.जेष्ठ दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप व प्रा. तुकाराम दरेकर यांच्यासह सध्या राजकारणात सक्रीय असणाऱ्या अनेकांनी २०१४ मध्ये पाचपुते विरोधकांची मोट बांधली होती. त्यावेळी राहूल जगताप यांना आमदार करण्यात पाचपुते विरोधकांच्या मतांची न झालेली विभागणी सर्वात मोठी बाजू होती. ही एकी काही…
शालेय क्रिकेट स्पर्धेत दुहेरी यश श्रीगोंदा,ता. ३० : तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या क्रिकेट संघांनी दोन गटात विजेतेपद मिळवत दुहेरी यश संपादन केले .काष्टी येथील परिक्रमा संकुल येथे नुकत्याच तालुकास्तरीय शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. यात विद्याधाम प्रशालेच्या १४ वर्ष मुलांच्या संघाने तर १७ वर्ष मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले .मुलांच्या संघाने लोणी व्यंकनाथ संघाचा ८ गडी राखून पराभव करीत एकतर्फी विजय मिळवित अजिंक्यपद खिशात घातले. यात जुनैद पठाण ,करण ठाणगे, सार्थक भोस , समर्थ मखरे ,धीरज हानवते या खेळाडूंनी फलंदाजी व गोलंदाजीत चमक दाखवत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.१७ वर्षे वयोगटात साक्षी बनकर,समीक्षा वाळुंज,ज्योती…
पाणीच उपलब्ध होईना, शेतकऱ्यांचे पुन्हा आंदोलन संजय आ. काटे (Saklai Upsa Irrigation Scheme News )श्रीगोंदा, ता. २८ : अनेक वर्षे गाजणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भाजप सरकारने ही योजना करण्याचे आश्वासन देत, योजनेचे घोड धरणावरुन सर्व्हेक्षणही केले. पण आता योजनेसाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने योजना पुढे सरकत नाही. याच योजनेसाठी आज शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले होते. श्रीगोंदा व नगर तालुक्यातील ३२ गावांसाठी साकळाई योजना महत्वाची आहे. जवळपास तीस वर्षांपासून या योजनेसाठी पाठपुरावा सुरु आहे, पण त्यात यश येत नाही. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते, नगरचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, तत्कालिन भाजपनेते घनशाम शेलार यांनी…
सरासरीपेक्षा ३५२ मिलीमीटर जास्तीचा पाऊस संजय आ. काटेAgricultural News श्रीगोंदा, ता. २५ : रब्बीचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या श्रीगोंदेकरांना यंदा खरीपातच वरुणराजाने चांगलेच झोडपले आहे. आजअखेर सरासरीपेक्षा ३५१.७ मिलीमीटर जास्त पावसाची नोंद झाली आहे.जून ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यात श्रीगोंदा तालुक्यात सरासरी ४०२ मिलीमीटर पावसाचा अंदाज असतो. पण यंदा ऑगस्ट महिना संपण्याला आठवडा बाकी असतानाच सरासरीपेक्षा ३५२ मिलीमीटर जास्तीचा पाऊस झाला आहे.जास्तीचा पावसाने पिकांची हानी….कृषी विभागाच्या माहितीनूसार आजपर्यंत तालुक्यात ५८०.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एरव्ही याच दरम्यान हाच पाऊस साधारण २२८.६ मिलीमीटर होणे अपेक्षीत होते. तो मोठ्या प्रमाणात जास्त झाला आहे. हा जास्तीचा पाऊस पुढच्या दृष्टीने चांगला असला तरी…
पावसाने हवालदिल लोकांना लंके यांचा आधारअहमदनगर, ता. २४ : अहमदनगर शहरातील काही भागात अतिवृष्टीने हाहाकार माजवीला आहे. घरात पाणी शिरले, रस्ते जलमय झाल्याने नागरिक हवालदिल झाले. या नागरिकांना दिलासा व आधार देण्यासाठी खासदार नीलेश लंके धावून आले.शहरातील नारहरी नगर आणि गुलमोहर रोड येथील नागरिकांना मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय होऊन घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला.नागरिकांनी नगरसेवक योगराज गाडे यांना संपर्क करून मदतीची विनंती केली, आणि त्यांनी लगेचच खासदार निलेश लंके यांना याची माहिती दिली. सिंधी समाजाच्या उत्सवाचा कार्यक्रम संपवून परतताना लंके यांनी तत्काळ आपल्या वाहनाची दिशा बदलून घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची स्थिती पाहून त्यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक…
घन:शाम शेलार यांच्यासाठी लागली फिल्डींग संजय आ. काटे श्रीगोंदा, ता. २४ : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) जागा काँग्रेसला सोडावी यासाठी पक्षाकडे मागणी करण्यात आली आहे. पक्षाच्या नेत्यांनी जिल्ह्यातील पाच जागा काँग्रेसकडे राहतील असे सुचोवात केल्याने, दक्षिणेत श्रीगोंद्यासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जेष्ठ नेते घन:शाम शेलार ( Ghansham Shelar) यांच्यासाठी कार्यकर्ते व नेते आग्रही असल्याचे दिसते.अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसची ताकत अजून वाढविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन हालचाली सुरु आहेत. उत्तरेत संगमनेर व श्रीरामपुर येथे काँग्रेसचे आमदार असल्याने त्या दोन्ही जागा आघाडीच्या वाटपात पुन्हा काँग्रेसकडे येतीलच, पण अजून काही महत्त्वाच्या जागांसाठीही पक्षाचा आग्रह असल्याचे समजते.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे खासदार…