Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Nagar Today
नगर तालुक्यातील दौऱ्यात आवाहन अहमदनगर, ता. २ : राजकारणासाठी लोकांना झुलवत ठेवून थापेबाजी करणाऱ्यातील नागवडे कुटुंब नाही. स्वर्गिय दादापाटील शेळके यांच्यासोबत स्वर्गिय शिवाजीराव बापु नागवडे यांनी संस्काराचे व प्रामाणिकपणाचे राजकारण केले. ‘साकळाई’बाबत अनेकांनी तुम्हाला आश्वासने दिली, पण यावेळी आमच्यावर विश्वास टाका आम्ही साकळाईचे पाणी मिळवून देवू अशी ग्वाही राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी दिली.अनुराधा नागवडे काही दिवसांपासून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या नगर तालुक्यातील गावांमध्ये जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. त्या भागातील दौऱ्यात बोलताना त्या म्हणाल्या, नागवडे कुटुंबाने कायमच संस्कारक्षम राजकारण केले आहे. बापुंनी कुटुंबासह कार्यकर्त्यांना दिलेले हे संस्कार तह्यात जपले जातील. केवळ सत्तेसाठी लोकांना शब्द देवून भुलथापा मारण्याचे उद्योग…
तुतारी मिळू न देण्यासाठी आघाडीतील नेत्यांची यंत्रणा कार्यरत –संजय आ. काटे श्रीगोंदा, ता. १ : माजी आमदार राहूल जगताप यांना शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे तुतारी चिन्ह मिळू नये, यासाठी श्रीगोंद्यातून मोठी यंत्रणा राबत आहे. अनेक शिष्टमंडळे आणि काही नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटी घेत आहेत. जगताप यांना उमेदवारीपासून रोखण्यासाठी ही यंत्रणा राबत असतानाच, ‘दुसरे कुणालाही द्या पण जगताप यांना नको’ अशी भूमिका घेतली जात असल्याची खात्रीशिर माहिती आहे.गेल्या विधानसभा व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांची श्रीगोंद्यात मोठी राजकीय ताकत आहे हे पुन्हा सिध्द झाले. गेल्या विधानसभेला घनशाम शेलार यांची जी लाट तयार झाली, त्याला…
स्वतंत्र भारत पक्षाच्या प्रयत्नांना मोठे यश श्रीगोंदा, ता. १ : खरीप २०२३ हंगामातील थकीत पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद केली आहे. स्वतंत्र भारत पक्षाने केलेला पाठपुरावा व आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे अशी माहिती, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांना दिली. खरीप २०२३ या हंगामात दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. मात्र दीड वर्ष होऊन गेले तरी विमा कंपनीकडून पीक विम्याचे पैसे मिळत नसल्यामुळे स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेने अनेक आंदोलने केली. एक ऑगस्ट २०२४ रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा आंदोलन करण्यात आले होते. दिनांक ९ सप्टेंबर…
संजय आ. काटेश्रीगोदा, ता. २९ : राज्याच्या राजकारणात कायमच खास चर्चेत राहिलेल्या नगर जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा शरद पवार यांच्याच भोवती फिरु लागले आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या जिल्ह्यात विशेष लक्ष देवून करामत करतील असे वाटत होते. तसे घडत नसून उलट आता शरद पवार यांचे वर्चस्व वाढतच असताना अजित दादांची राष्ट्रवादी बॅकफूटवर दिसतेय. विधानसभेसाठी साहेबांची जोरदार तयारी असतानाच अजितदादांची अडचण वाटते.जिल्ह्यातील महत्वाच्या मतदारसंघावर शरद पवार यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांचे वजनदार नेते आता जिल्ह्यातील ठराविक मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवून तेथील वास्तव चित्र साहेबांपर्यंत पोच करीत आहेत. त्यामुळे शरद पवार यांना जिल्ह्यातील खरी परिस्थिती लक्षात येत…
श्रीगोंद्यात रयतच्या संकुलांची उद्घाटने श्रीगोंदा, ता. २८ : कर्मवीर भाऊराव पाटील हे तीन महापुरुषांचे वारसदार म्हणून होते. त्यांच्या जीवनामध्ये आधुनिकता होती. आज रयत शिक्षण संस्थेने कात टाकली आहे. भविष्याकडे नवीन दृष्टिकोनातून पाहनाच,आधुनिकतेचा स्वीकार केला पाहिजे. समाजालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने करावे, अशी अपेक्षा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलातील महादजी शिंदे विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाखांच्या विविध कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभ ऑनलाइन पद्धतीने महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या…
खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून राहूल जगताप यांच्या पाठीवर थाप श्रीगोंदा, ता. २७ : राज्यातील अनेक कारखानदार सरकारच्या राजकीय आमिषाला बळी पडले. एनसीडीसीचे कर्ज घेण्यासाठी एक तर शरद पवार यांची साथ सोडली नाही तर सरकारच्या पक्षात सामिल झाले. पण श्रीगोंद्याचा राहूलदादा जगताप या पठ्ठ्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यांनी सत्तेपुढे मान झुकवली नाही या शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी राहूल जगताप यांचे कौतुक करताना त्यांच्या पाठीवर थाप टाकली.शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजीत शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी श्रीगोंद्यात पोचली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सभेसाठी मोठी गर्दी होती. अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके,…
विधानसभा लढण्यासाठी अनेकांची मोर्चेबांधणी, मध्यस्थांची रेलचेल वाढली संजय आ.काटेश्रीगोंदा, ता. २५ : कधी नव्हे एवढे इच्छूक यदांच्या विधानसभेला समोर येत आहेत. जो कोणी भेटेल तो म्हणतोट विधानसभेला मी पण इच्छूक आहे. यातील बहुतेक मैदानात लढण्यासाठी नव्हे तर स्वत:चे राजकीय महत्व अधोरेखित करण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगतोय का असा प्रश्नही पुढे येतोय. त्यातच काही नेत्यांच्या जवळ असणाऱ्या निष्ठावंतांना मध्यस्थांची भूमिका बजावावी लागणार असल्याचे अशा लोकांची रेलचेल वाढली आहे.आमदार बबनराव पाचपुते अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. त्यामुळे यावेळी आपण आमदार होणार हे स्वप्न बाळगून काहींनी पत्ते टाकण्यास सुरुवात केली आहे. प्रमुख नेत्यांसह दुसऱ्या फळीतील व ज्यांचा ठराविक भागातच संपर्क आहे त्यांनाही अशी स्वप्ने पडू…
शेतकऱ्यांना आता दुधाला प्रतीलिटर ३५ रुपये दर शिर्डी, ता. २४ : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर मागे ७ रुपये अनुदान दिले जाणार आहे. वाढीव अनुदान योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना यापुढेही प्रतिलिटर ३५ रुपये दर मिळणार असल्याची माहिती पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.दूध उत्पादकांच्या अडचणी पाहता, दुधाला वाढीव भाव मिळावा यासाठी मा. मंत्री विखे पाटील यांनी सातत्याने प्रयत्न करत आहेत. या अगोदर त्यांनी प्रतिलीटर ५ रुपये अनुदान देवून दूध…
शिक्षक आदर्शच आहे मग त्यासाठी पैशाची गरज का ? अहमदनगर, ता. २४ : ‘पैसे द्या अन् काम करून घ्या’, असा मंत्र काही शासकीय कार्यालयात राबविला जातो, या मंत्राची अंमलबजावणी सर्वच ठिकाणी केली जाते. पण आता असाच काहीचा मंत्र शिक्षण क्षेत्रात राबवला जात असल्याची पक्की खबर आहे. आदर्श व्हायचे का ? असे विचारत रक्कम ठेवा आणि पुरस्कार घ्या, अशी थेट ऑफर शिक्षकांना दिली जात असल्याने जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे. शिक्षण क्षेत्र पवित्र समजले जाते. भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षक जीवाचे रान करतात. प्रामाणिकपणा ठेवून ज्ञानदानासोबतच सरकारच्या विविध उपक्रमात राबत असतात. पण आता त्यांना एका ठिकाणाहून आपणाला आदर्श असल्याचा पुरस्कार देवून आम्ही सन्मान…
ग्रामसेवक संघाच्या प्रयत्नांना दहा वर्षांनंतर अखेर यश श्रीगोंदा, ता. २३ : राज्यातील ग्रामसेवकांच्या दहा वर्षाच्या लढ्याला आज यश आले. राज्य सरकारने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे बाजूला ठेवून आता ग्रामपंचायत अधिकारी या नव्या पदाला मान्यता दिल्याने मोठे यश मिळाले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या वतीने सन २०१४ मध्ये ग्रामसेवकांवरील व ग्रामविकास अधिकारी यांच्यामधील वेतनाची असलेली वेतनश्रेणीतली तूट भरून काढण्यासाठी ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी या दोन पदांचे एकच पद करून ग्रामसेवकावरील अन्याय दूर करावा अशी भूमिका राज्य ग्रामसेवक संघाने मांडली होती.तत्कालीन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष विजय म्हसकर,राज्य कार्याध्यक्ष विठ्ठलराव वाडगे व या सर्वांमध्ये मुख्य भूमिका घेणारे तरुण तडफदार…