Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Nagar Today
अनुराधा नागवडे श्रीगोंद्यातून महाविकास आघाडीच्या उमेदवार…. संजय आ.काटे तुतारी मिळविण्यासाठी मुबंईत तळ ठोकून बसलेले माजी आमदार राहूल जगताप रिकाम्या हाताने परतले. त्याचवेळी काही दिवसांपूर्वीची महायुतीच्या लाडक्या बहिण असणाऱ्या अनुराधा नागवडे यांच्या मनगटावरील घड्याळ जावून तेथे शिवबंधन आले. थेट शरद पवार यांनाच महाविकास आघाडीच्या उमेदवारीत शह देत नागवडेंना उमेदवारी मिळवून देण्यात किंगमेकर ठरलेले शिवसेनेचे उपनेते साजन सदाशिव पाचपुते हे नागवडे कुटुंबासाठी गेमचेंजर ठरले.श्रीगोंद्याचे राजकारण काय व कसे असते ते पुन्हा एकदा राज्याने अनुभवले. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयात श्रीगोंदेकरांनी महत्वाचे योगदान दिले. ३२ हजार मतांची आघाडी त्यांना दिली. यात राहूल जगताप, घनशाम शेलार व साजन पाचपुते यांचा…
संजय आ. काटे अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्यांचे लक्ष लागून असलेल्या श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील फाईट अजूनही फिक्स होत नाही. भाजपाने डाॅ. प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी निश्चित करीत आघाडी घेतली. पण महाविकास आघाडीचे भिजत घोंगडे अजूनही तसेच आहे. राहूल जगताप की अनुराधा नागवडे हा निर्णय अजूनही पेडिंग पडला आहे. आज फैसला होण्याची शक्यता असल्याने सगळ्यांच्या नजरा मुबंईकडे लागल्या आहेत. विधानसभा निवडणूक सुरु झाल्यावर महाविकास आघाडीत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राहूल जगताप व काँग्रेसचे घनशाम शेलार यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेंच होती. त्याचवेळी भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते, सुवर्णा पाचपुते व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे यांच्यात महायुतीच्या उमेदवारीची चर्चा होती. पण काही दिवसात…
संगमनेरचा रणसंग्राम संगमनेर, ता. २१ : तालुक्यातील जनतेन तुमचा चाळीस वर्षाचा कारभार पाहायला त्यामुळे तालुक्याच्या आमदारांच्या निष्क्रीयतेवर बोललो तर राग यायचे कारण काय ॽ अहो ताई,लोकशाहीत मायबाप जनता बाप असते. तालुक्याचा बाप कोण हे येत्या निवडणुकीत जनता दाखवून देईल असे सडे तोड प्रतिउत्तर डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिले. साकूर येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा संकल्प मेळाव्यात डाॅ सुजय विखे यांनी पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. चाळीस वर्षे सर्व सत्तास्थान असूनही पठार भागाच्या जनतेला पाणी मिळवून देता आले नाही. या भागात युवकांना रोजगाराच्या संधी दिल्या नाहीत. या निष्क्रीयतेवर बोललो तर तुम्ही थेट बाप काढाला.…
अहिल्यानगर- दौंड महामार्गावरील टोलविरोधात एकजूट अहिल्यानगर-दौंड महामार्गावर निमगावखलू परिसरातील टोल आज आंदोलनानंतर बंद झाला. स्थानिक वीस किलोमीटर परिसरातील वाहनांना सुट मिळावी यासाठी स्थानिक व्यापारी व तरुणांनी सुरु केलेल्या संघर्षाला आज यश मिळाले. या सुटीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत टोल बंद ठेवण्याचे ठरले.काष्टी व्यापारी संघटना व परिसरातील तरुणांनी घेतलेल्या पुढाकारातून या टोलनाक्या विरोधात पुन्हा आंदोलन झाले. काष्टी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय काळे, सांगवीचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश भोईटे, व गार येथील सामाजीक कार्यकर्ते विनायक मगर यांच्या नेतृत्वाखाली टोल नाका येथे धरणे आंदोलन झाले. यात आसपासच्या गावातील वाहनमालक, व्यापारी सहभागी झाले होते. आंदोलनाची वाढती व्याप्ती पाहून राजकीय नेत्यांचीही आंदोलनात एन्ट्री झाली. आंदोलनात काष्टी…
विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी द्या आई-वडिलांची इच्छा संजय आ. काटे जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात हॉट असणारा श्रीगोंदा तालुका सध्या उमेदवारी मागणीने आणि उमेदवारी बदलाच्या परस्पराविरोधी संघर्षात गाजतोय. भारतीय जनता पक्षाने डॉ. प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी काल जाहीर केली. पण त्याचे पडसाद त्यांच्या कुटुंबात लगेच जाणवले. विक्रमसिंह पाचपुते हे उमेदवारीसाठी इच्छुक असताना त्यांच्या आईला उमेदवारी गेल्याने काहीशी अस्वस्थता निर्माण झाली. आमदार बबनराव पाचपुते व डॉ. प्रतिभा पाचपुते या तातडीने मुंबईला रवाना झाले. थोड्याच वेळात पक्ष नेतृत्व सोबत चर्चा करून विक्रम सिंह यांना उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी राहणार आहे या परिस्थितीत नेमके काय होते याकडे लक्ष आहे. महाविकास आघाडीत श्रीगोंद्यात माजी आमदार…
संजय आ. काटे महाविकास आघाडीचे उमेदवारीवरुन तळ्यात मळ्यात सुरु असतानाच, भारतीय जनता पक्षाने आज श्रीगोंद्यात मास्टरस्ट्रोक मारला. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डाॅ. प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर करुन लाडकी बहिण योजनेचा फायदा उचलण्यासाठी पहिले पाऊल उचलले.आमदार बबनराव पाचपुते आजारी असल्याने त्यांच्या घरात उमेदवारी दिली जाणार हे निश्चित होते. त्यासाठी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यातच त्यांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी असणारी जवळकी, तरुण चेहरा यामुळे महायुतीची उमेदवारी त्यांना मिळू शकते असा कयास बांधला जात होता. पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी आज पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि तीत प्रतिभा पाचपुते यांचे…
अनुराधा नागवडे यांची विधानसभेची तयारी….. संजय आ. काटे शिवाजीराव बापु नागवडे या नावात फार मोठी ताकत होती व आजही आहे. ज्या माणसाने राजकारण व समाजकारण करताना कधीच आपल्या कुटुंबाकडे लक्षही दिले नाही त्याच ‘बापुं’च्या सुनबाई अनुराधा राजेंद्र नागवडे यांना उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. एक महिला आमदार तालुक्याला मिळावी यासाठी सगळेच प्रयत्नशिल आहेत. पण बापुंच्या नंतर तरी त्यांच्या कुटुंबातील आमदार व्हावा, यासाठी आता कार्यकर्त्याला पेटून उठावे लागणार आहे….घोड धरणासाठी संघर्ष, लाभक्षेत्रातील शेतीला पाणी मिळावे यासाठी संघर्ष, सहकारी कारखानदारी टिकविण्यासाठी संघर्ष असा संघर्षमय प्रवास केलेले कर्मयोगी म्हणजे शिवाजीराव नारायणराव नागवडे उर्फ बापु.. या व्यक्तीविषयी आजही श्रीगोंद्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एक आदराचे स्थान…
२० किलोमीटरच्या वाहनांना टोलमाफी द्यावी यासाठी पुन्हा आंदोलन संजय आ. काटेश्रीगोंदा, ता. २० : अहिल्यानगर- दौंड महामार्गावरील सांगवीदुमाला ते निमगावखलू या दरम्यान असणारा पथकर नाका (टोल) आसपाच्या गावातील वाहनधारकांच्या खिशाला कात्री लावतोय. महामार्गाच्या कामातील अनेक नियम पायदळी तुटविणाऱ्या ठेकेदाराला व त्याला पाठीशी घालणाऱ्या सरकार, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना आता लोक जाब विचारु लागले आहेत. पण या टोलच्या ठेक्यात कुणाची भागीदारी आहे, एकात इतर दोघे कोण आहेत याची उलटसुलट सुरु असणारी चर्चा राजकीय नेत्यांपर्यंत येवून ठेपली आहे.सांगवीदुमाला ते निमगावखलू या दरम्यान हा टोलनाका उभारण्यात आला आहे. महामार्गाचे काम झाले असले तरी अनेक ठिकाणी रस्ता निकृष्ट आहे. लोणीव्यंकनाथ जवळील रेल्वेगेट येथील रस्ता…
नागवडे यांच्या मेळाव्याकडे लक्ष… संजय आ. काटेश्रीगोंदा, ता. १९ : आज दिवसभर राज्याच्या राजकारणात श्रीगोंद्याची चर्चा होती. शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र नागवडे यांच्या भोवती फिरणाऱ्या राजकीय घडामोडीत शरद पवार गटाचे माजी आमदार राहूल जगताप हेही मुंबईत होते. हाती आलेल्या माहितीनूसार महाविकास आघाडीची जागा शिवसेनेकडे जात असून साजन पाचपुते की अनुराधा नागवडे याचा निर्णय उद्या होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान राहूल जगताप यांच्या म्हणण्यानूसार ही जागा पवार गटच लढविणार आहे. तथापि नागवडे यांनी उद्या रविवारी दुपारी मेळावा बोलविण्यात आला आहे. श्रीगोंद्याच्या महाविकास आघाडीच्या जागेवरुन मोठा खल सुरु आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वादाचे मूळ कारण अजित पवार यांची…
जगताप नको म्हणून मुंबईत पुन्हा लागली फिल्डींग संजय आ. काटेश्रीगोंदा, ता. १६ : आम्हालाच उमेदवारी द्या ही बाजू रेटण्यापेक्षा राहूल जगताप यांना उमेदवारी देवू नका यासाठी काही नेत्यांनी मुंबईत पुन्हा फिल्डींग लावली आहे. त्यामुळे विरोधकांनी राहूल जगताप यांची धास्ती घेतली आहे का अशी शंका घेतली जावू लागल्याने जगताप यांना त्याचा फायदा होतोय. २०१४ मध्ये राहूल जगताप हे आमच्यामुळेच आमदार झाले हे राजकीय गणित मांडणारे काही नेते सध्या जगताप यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. विशेष म्हणजे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्याविरोधात फारसे कुणी बोलत नसतानाच सगळ्यांचे टार्गेट जगताप झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातही जगताप यांचीच चर्चा वाढली आहे, हे त्यांच्या विरोधकांच्या…