Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Nagar Today
निधीची कमी आणि टक्केवारीची चर्चा जास्त संजय आ. काटे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ बहुतेक वेळा आमदार बबनराव पाचपुते यांच्याच पाठीशी आहे. मतदारसंघाचा विकास झाला नाही असेही नाही, पण मुलभुत प्रश्न सुटलेले नाहीत हेही वास्तव नाकारता येत नाही. गेल्या पाच वर्षात पाचपुते यांनी कोट्यावधींचा निधी आणल्याचा दावा भाजपाचे उमेदवार विक्रम पाचपुते करतात. पण त्याचवेळी त्यांच्यावर याच निधीतून टक्केवारी कमावल्याचा गंभीर आरोप होतोय. त्यातच तालुक्यात निधी आला पण दर्जेदार कामे झाली का ? या प्रश्नांचे उत्तरेही पाचपुते यांना द्यावी लागणार आहेत. केवळ विरोधकांच्या मतांच्या विभागणीवर विजयाचे गणित आखणाऱ्या पाचपुते यांना गाफिल राहूल चालणार नाही.यंदाच्या निवडणूकीत पाचपुते-नागवडे- जगताप या तीन प्रस्थापित घराण्यांसह अण्णासाहेब शेलार,…
उमेदवार- अनुराधा राजेंद्र नागवडे.. पक्ष शिवसेना (उबाठा) चिन्ह- मशाल संजय आ. काटे श्रीगोंदा विधानसभा निवडणूकीत मतदान यंत्रावर पहिल्या क्रमांकावर असणारे नाव आहे अनुराधा राजेंद्र नागवडे… चिन्ह मशाल…२००९ ला विधानसभा लढण्याची चालून आलेली संधी सोडली, आणि २०१९ ला का थांबल्या हे कुणालाच समजले नाही. यावेळी अपक्ष लढणार असे वाटत असतानाच शेवटच्या टप्यात मशाल हाती घेतली. नागवडे कुटुंबाच्या राजकारणात खुप चुका झाल्या आणि होतही आहेत. त्यांची आमदार होण्याची संधी अजूनही संपलेली नाही फक्त लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि प्रचारातील नियोजन याची सांगड घालावी लागेल. विरोधकांचे काय चालले हे पाहण्यापेक्षा आपण कुठे कमी पडतोय याकडे लक्ष दिले तर संधी साधू शकतात.अनुराधा नागवडे हे नाव…
जगताप यांच्याकडे जायचेय…. पण लोकसभेची आठवण ताजी…. संजय आ. काटे लोकसभा निवडणूकीत श्रीगोंद्यातून खासदार नीलेश लंके यांना जे मताधिक्य मिळाले त्यात माजी आमदार राहूल जगताप यांचा मोठा वाटा आहे. आता विधानसभा निवडणूकीत विखे समर्थकांना जगताप यांच्याकडे जायचे आहे पण लोकसभा निवडणूकीत त्यांनी डाॅ. सुजय विखे यांना केलेला विरोध अजूनही ताजा आहे. त्यातच आमदार बबनराव पाचपुते यांनीही विखे यांच्या समर्थकांना प्रचारात सक्रिय करुन घेतले नाही. नागवडे हेही विरोधातच होते . या सगळ्या गोंधळात नेमके कुणाला पाठींबा द्यायचा या निर्णय घेताना विखे समर्थकांची गोची झाल्याचे लक्षात येत आहे. श्रीगोंद्यात यंदा विधानसभा निवडणूकीत रंगत आली आहे. बहुतेक प्रमुख नेते रिंगणात आहेत. काही महिन्यांपुर्वीच…
प्रमुखांवर होतेय मोठी उधळण…. संजय आ. काटे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात अनेक कार्यकर्त्यांना आमिषे दाखवून त्यांना फोडले जात आहे. हे एकाच पक्षात अथवा उमेदवाराकडे होत नसून बहुतेक प्रमुख उमेदवारांची यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहे. त्यासाठी नेत्यांचे खास पॅर्टन राबत असून शहर व गावातील कार्यकर्त्यांचे वेगळे रेटकार्ड असून काही नेत्यांचे खिसे भरण्यासाठी मोठी बोली लागल्याची चर्चा आहे.श्रीगोंद्यात महायुतीकडून विक्रम पाचपुते, महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे, ‘वंचित’चे अण्णासाहेब शेलार यांच्यासह राहूल जगताप हे अपक्ष रिंगणात आहेत. यांच्यासोबत इतरही महत्वाचे उमेदवार असले तरी सध्या या चौघांचीच चर्चा रंगली आहे ती फोडाफोडीच्या राजकारणाने. मोठ्या नेत्यांचे पक्षबदल, उमेदवार बदल झाले. आता गेल्या काही दिवसांपासून प्रमुख कार्यकर्त्यांची लिलाव पध्दतच…
संजय राऊत यांचा गंभीर आरोपआमच्यावर आरोप करणाऱ्या राहूल जगताप यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले आहेत. अशा लोकांना महाविकास आघाडी उमेदवारी कशी देणार. आता त्यांचा रिमोट देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असून फडणवीस जगताप यांना ऑपरेट करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी करतानाच, शरद पवार हे अनुराधा नागवडे यांच्याच पाठीशी असल्याचा दावा केला.वांगदरी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करताना राऊत बोलत होते. ते म्हणाले, साजन पाचपुते यांच्यासाठी आम्ही लढाई केली. साजन यांना वर्षांपुर्वीच सांगितले की होते , ‘की तुला श्रीगोंदा लढायचा आहे’. त्यावेळी साजनची तयारी नव्हती. आधी उमेदवारी मग तयारी ही शिवसेनेची खासियत आहे. आम्ही साधे…
मतविभागणी हा विरोधकांचा मायनस पाॅईंट संजय आ. काटे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपाने ऐनवेळी उमेदवारी बदलली असली तरी त्याचा फायदा विरोधकांना मिळणार नाही. आमदार बबनराव पाचपुते यांचा एकसंघ असणारा गट ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. विरोधकांमधील दुफळीचा फायदाही त्यांना मिळणार असल्याने आज तरी विक्रम पाचपुते मतदार संघाच्या चर्चेत पुढे दिसत आहेत. विधानसभा निवडणूक लागण्यापुर्वीच महाविकास आघाडीत कुरबुर सुरु झाली होती. त्यातच नैसर्गिक आघाडी असणारे नागवडे व जगताप हे दोन गट एकमेकांच्या विरोधात ठाकले होते. या दोघांची मतांची बेरीज पाचपुते यांच्यासाठी अडचणीची ठरते हा इतिहास आहे. त्यातच गेल्यावेळी थोड्या मतांनी पराभूत झालेले घनशाम शेलार हेही वेगळ्या मूडमध्ये होते. त्यामुळे गोंधळ…
पवार, गांधींचे छायाचित्रे वापरुन प्रचार श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहूल जगताप यांच्या सोशल मिडीयातील प्रचार पोस्टरवर काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार )अध्यक्ष शरद पवार यांचे छायाचित्रे वापरली जात आहेत. जगताप हे अपक्ष असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार असतानाही ते या नेत्यांचे छायाचित्रे वापरत असल्याने त्यांना नोटीस निघणार असल्याची माहिती आहे.श्रीगोंद्यात विधानसभा निवडणूकीतील प्रचार जोरात सुरु झाला आहे. महायुतीचे विक्रमसिंह पाचपुते, महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे, वंचितचे अण्णासाहेब शेलार, व अपक्ष असणारे राहूल जगताप यांच्यात सध्या तरी मुख्य लढत दिसत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचार पत्रकांवर राहूल गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे या प्रमुख नेत्यांचे…
श्रीगोंद्यात भाजपाची उमेदवारी विक्रमसिंह पाचपुते यांनी घेतली संजय आ. काटे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसात अनपेक्षीत धक्कादायक राजकीय घटना घडत आहेत. आज भाजपाने जाहीर केलेली प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी ऐनवेळी बदलून त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांना दिली. विधानसभा निवडणूकीत दाखल अर्जांच्या माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन महत्वाच्या घडामोडी घडल्या. भाजपाच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी अर्ज काढून घेतला. त्यामुळे नियमानूसार त्यांच्या मुलाकडे म्हणजे विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडे पक्षाची उमेदवारी गेली. पक्षाने आईला पसंती दिली पण आईची पसंती मुलाला होती. ज्यावेळी पहिल्या यादीत भाजपाने प्रतिभा पाचपुते यांचे नाव घोषित केले त्याचदिवशी विक्रमसिंह समर्थक नाराज दिसले. कारण गेली दोन वर्षे विक्रमसिंह हे…
पाचपुते-नागवडे यांना कुकडीवाले शह देणार का ? संजय आ. काटेजवळपास पन्नास वर्षांपासून एक अपवाद वगळता श्रीगोंदा मतदारसंघावर घोड खालील नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. मर्यादीत असणाऱ्या घोडच्या पट्याने तालुक्यावर अधिराज्य गाजवले आहे. यंदाही महत्वाच्या दोन पक्षीय आघाड्यांच्या उमेदवारी याच घोड पट्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता कुकडी पट्ट्यातून बंड होतेय का व त्याला कुकडी खालील मतदार साथ देतात का हे पाहणे महत्वाचे आहे.तसे झाल्यास पुन्हा एकदा घोड विरुध्द कुकडी असा राजकीय संघर्ष पाह्याला मिळेल. माजी मंत्री राहिलेले विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी १९८० पासून प्रत्येकवेळी विधानसभा लढविली. आता त्यांच्या पत्नी डाॅ. प्रतिभा पाचपुते उमेदवारी करीत आहेत. त्यांच्यासोबतच माजी आमदार दिवंगत नेते शिवाजीराव…
जगताप समर्थक कार्यकर्ते म्हणतात अपक्ष लढा आणि गुलाल घ्या… संजय आ. काटेराष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवारी देईन या आशेवर बसलेल्या माजी आमदार राहूल जगताप यांच्या हाती निराशा आली. अनुराधा नागवडे यांना पक्षात घेत शिवसेनेने उमेदवारी दिल्याने जगताप यांच्या सोबत गोलीगत धोका झाला आहे. पण आता राजकारणाच्या या लढाईत कुंडलिकराव तात्या यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विरोधकांना बुक्कीत टेंगुळ आणण्याची तयारी साठी राहूल जगताप तयारीत आहेत. लोकसभा निवडणूकीत निष्ठावान राहिलेल्या जगताप यांना आज महाविकास आघाडीने डावलले. अनुराधा नागवडे यांच्यावर विश्वास टाकत महाविकास आघाडीने त्यांच्या हाती मशाल देत ठाकरे गटाने जल्लोष केला. आपल्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास टाकणाऱ्या जगताप यांना शरद पवार यांनी का…