Author: Nagar Today

श्रीगोंद्याचा ‘सिंह’ ‘विक्रम’च. शांतपणे केलेली खेळी विरोधकांना समजलीच नाही. संजय आ. काटे विरोधकांनी मोठा आरडाओरडा केला, सोशल मिडीयावर उपहासात्मक टीकेची झोड उठवली. तालुक्यातील बहुतेक बडे नेते विरोधात होते. त्यातच आईची उमेदवारी त्यांच्या वाट्याला आली. वडील नेते असले तरी आजारी असल्याने घरच्या अडचणीही होत्या. पण गडी डगमगला नाही. शांतपणे विरोधकांचे डाव पाहत राहिला आणि आपले डाव सुप्तपणे टाकत राहिला. आज तोच तालुक्यात आमदार झाला आणि उद्याच्या राजकारणाची सगळी सुत्रे हाती घेत श्रीगोंद्याचा खरा सिंह आपणच आहोत हे दाखवून दिले आहे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी….माजी आमदार राहूल जगताप, राजकारणातील एक बडे प्रस्थ असणाऱ्या अनुराधा नागवडे व माळी समाजाचे तगडे नेते अण्णासाहेब…

Read More

संजय आ. काटे महाविकास आघाडीतून तुतारी चिन्हावर राहूल जगताप हेच उमेदवार असतील असे ठणकावून सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेपुढे झुकल्याचे दिसले. पण महाविकास आघाडीकडून मशाल हाती घेवून मैदानात उतरलेल्या अनुराधा नागवडे यांच्यासोबत शरद पवार यांची राष्ट्रवादी दिसत नाही. किंबहुना राहूल जगताप यांच्याच पाठीवर पवारांचा हात असल्याचे संकेत असल्याने निवडणूकीत नेमके काय होतेय याकडेच लक्ष आहे. महाविकास आघाडीतून तुतारी हे चिन्ह घेण्यासाठी पाच दिवस मुबंईत तळ ठोकणाऱ्या राहूल जगताप यांच्या हाती निराशा आली. त्याचवेळी शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्या मध्यस्थीने अनुराधा नागवडे यांनी आघाडीची उमेदवारी मिळवली. पण त्यामुळे हताश झालेल्या जगताप यांनी सहानुभुतीच्या बळावर अपक्ष उमेदवारी करीत आव्हान उभे केले.आता मतदारंसघात…

Read More

साजन पाचपुते ठरले ठाकरेंच्या सभेतील हिरो संजय आ. काटे गळ्यात पडणारी उमेदवारीची माळ दुसऱ्याच्या गळ्यात टाकण्याचे धारिष्ट्य दाखविणाऱ्या शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांचे आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेले कौतुक उद्याच्या राजकारणाची दिशा दाखविणारे आहे. अनुराधा नागवडे यांच्या प्रचारसभेसाठी आलेल्या ठाकरे यांनी साजन यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार खुप काही सांगून जाणारे असून साजन पाचपुते यांची नागवडे यांच्यासाठी सुरु असणारी राजकीय स्ट्रॅटर्जी निकालाची दिशा ठरविणारी असल्याचे दिसते. महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचार सभेसाठी उध्दव ठाकरे श्रीगोंद्यात येवून गेले. ते पहिल्यांदाच श्रीगोंद्यात येणार असल्याने त्यांच्याबद्दल उत्सुकता होती. त्यातच शिवसेनेने पहिल्यांदाच नागवडे यांच्या रुपाने मतदारसंघात मोठे आव्हान उभे केल्याने त्यांच्या भाषणाकडे…

Read More

नेत्यांसोबत आता कार्यकर्त्यांचेही खिसे गरम….. संजय आ. काटेविकास, आश्वासने, प्रलंबित कामे हे सगळे विषय बासनात गुंडाळले गेले असून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सध्या फक्त आणि फक्त तडजोडी सुरु आहेत. नेते, प्रमुख कार्यकर्त्यांना फोडण्यासाठी बॅगा भरुन रकमा पोच केल्या जात असून हे कुणा एकाचे सुरु नसून लढाईत उतरलेल्या बहुतेकांचे हेच ध्येय दिसत आहे. श्रीगोंदा विधानसभा निवडणूक आता वेगळ्याच ट्रेंडमध्ये आली आहे. निवडणूकीला आठ दिवस असतानाच पैशाचा चुराडा सुरु झाला आहे. चर्चेत असणारे आकडे ऐकुण अनेकांना भोवळ येत आहे. फुटलेले आणि रुसलेला कार्यकर्ता शोधून त्याच्या घरी जावून त्याला समजविण्याचे दिवस आता जूने झाले आहेत. जो कार्यकर्ता रुसला आहे त्याच्या घरी थेट बक्षिस पोच…

Read More

जागा सेफ झोन मध्ये असल्याने सभेची गरज नसल्याचा दावा…. संजय आ. काटे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार नसल्याचे समजते.श्रीगोंद्याची सीट सेफ झोनमध्ये असल्याने फडणवीस यांच्या सभा होणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी, वेगळे काही नाही ना याचीही खात्री श्रीगोंद्यातील भाजप नेत्यांना करावी लागणार आहे.यापूर्वी प्रत्येक महत्त्वाच्या निवडणुकात फडणवीस यांची येथे प्रचार सभा झाली आहे. परंतु फडणवीस आले की ‘साकळाई’चा मुद्दा पुन्हा एकदा ताजा होईल ही भीती भाजपाला वाटत आहे का ? व त्यामुळेच फडणवीस यांची सभा टाळली जात नाही ना अशीही शंका आहे.दरम्यान आमदार बबनराव पाचपुते हे…

Read More

संजय आ. काटे श्रीगोंद्यात तुतारीचा खुप गाजावाजा झाला पण ऐनवेळी महाविकास आघाडीच्या हाती मशाल आली. तुतारी मिळेल या आशेवर व शरद पवार यांच्या भरोशावर बसलेले राहूल जगताप आता रोड रोलर घेवून संधी शोधत आहेत. अपक्ष उमेदवार जगताप यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे या दोघांच्याही बॅनरवर ‘साहेब’ असले तरी ते नेमके कुणाच्या सोबतीला आहेत हे मतदारांना समजत नाही. लोकसभा निवडणूकीत तुतारीची जी क्रेझ होती ती कायम होती, त्याचा फायदा महाविकास आघाडीला उठविता आला नाही. लोकसभा निवडणूकीत खासदार नीलेश लंके यांना तुतारीने फाॅर्मात आणले. तीच तुतारी विधानसभेला आपल्या हाती असेल या भावनेने लंके यांच्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या माजी आमदार राहूल जगताप…

Read More

अनुराधा नागवडे यांच्या विजयासाठी येणार धावून संजय आ. काटे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीत पुन्हा एक नवा ट्विस्ट आला असून,जेष्ठ नेते घनशाम शेलार हे महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सरसावण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांनी बैठकीत समोर विरोध चालेल पण पाठीत खंजीर खुपसणाऱ्यासोबत नको असा आग्रह धरल्याचे समजते. त्यामुळे शेलार हे लवकरच नागवडे यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतील असे खात्रीशिररित्या समजले.महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्नशिल असणारे जेष्ठ नेते घनशाम शेलार यांनी ऐनवेळी प्रहारची उमेदवारी घेतली. पण काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्ष निरीक्षकांनी त्यांच्यावर आदरयुक्त दबाव आणत ती उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले, असे शेलार यांनीच यापुर्वी सांगितले आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत शेलार यांचा आमदार बबनराव…

Read More

मोहाळाचा दगड मारला….खरी लढाई आत्ता सुरु झाली संजय आ. काटेशिवसेना व ठाकरे कुटुंबाकडे चुकीचे बोट करण्याची हिम्मत कुणाची झाली नाही. ज्यांचे स्वकतृत्व शून्य आहे त्या राहूल जगताप यांनी शिवसेनेवर गलिच्छ आरोप केले. जगताप यांना माहिती नाही पण त्यांनी मोहाळाला दगड मारण्याची चूक केली आहे. त्यांना आता ते भोगावेच लागणार असून विधानसभेची लढाई खरी आत्ता सुरु झाली असून जगताप यांना त्यांच्या शब्दांचा करारा जबाब मिलेगा असा सज्जड इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांनी दिला.साजन पाचपुते म्हणाले, शिवेसना कायम सामान्यांच्या हिताचे राजकारण करते. ज्याला कुणी वाली नाही तेथे शिवसेना धावून जाते. त्यामुळे सामान्यांना शिवसैनिकांचा खरा आधार आहे. पण राहूल जगताप…

Read More

श्री क्षेत्र देवगड येथे येत्या १७ डिसेंबर रोजी ११११ कुंडात्मक यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त देवस्थान देवगड यांच्या सहकार्याने केडगाव (अहिल्यानगर ) येथील सदगुरु शंकर महाराज मठाच्या वतीने हा महादत्त यज्ञ सोहळा होणार आहे. त्यासाठी तेथील तयारी पुर्ण झाली आहे. या यज्ञ सोहळ्याच्या तयारीसाठी नुकतीच दत्त देवस्थान देवगडचे प्रमुख भास्करगिरी महाराज व शंकर महाराज मठ केडगावचे प्रमुख अशोक महाराज जाधव यांची बैठक झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात दत्तयज्ञ सोहळा देवगड येथे पहिल्यांदाच होत असून, त्याची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. देवगड हे उर्जात्मक तिर्थक्षेत्र म्हणून पुढे आले आहे. तेथे हा यज्ञ सोहळा होत असल्याने दत्त देवस्थानचे अधिकारी, कर्मचारी, सेवेकरी…

Read More

युतीचा धर्म पाळणार की, मैत्री निभावणार…. संजय आ. काटे जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक दत्तात्रेय पानसरे व बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांची श्रीगोंद्यातील राजकीय भूमिका अजूनही अस्पष्ट आहे. ते निवडणूकीत नेमके कुणासोबत आहेत हे कुणालाच काय त्यांनाही सांगता येणार नाही. हे दोघे तालुक्याच्या राजकारणातील पॅटर्न म्हणून ओळखले जात असल्याने ते काय भूमिका घेणार याची मतदारसंघाला उत्सुकता आहे. सध्या दत्तात्रेय पानसरे व बाळासाहेब नाहाटा हे दोघेही राष्ट्रवादी (अजित पवार ) काँग्रेसमध्ये आहेत. तालुक्यात महायुतीचे विक्रम पाचपुते हे उमेदवार आहेत. वास्तविक पाहता पानसरे व नाहाटा यांनी त्यांचे काम करणे म्हणजे युती धर्म पाळणे असा होईल. पण हे दोघेही त्यांच्या यंत्रणेत…

Read More