‘विद्याधाम’च्या खेळाडूंचा डंका


४३ बक्षीसे पटकावत गाजवले मैदान, १९ खेळाडूंची जिल्हास्तर निवड

देवदैठण : श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेतील खेळाडूंनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत ४३ बक्षीसे पटकावत मैदान गाजवले. १९ खेळाडूंची ३५ क्रीडाप्रकारात जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.
१४ वर्ष वयोगट : –
अथर्व बोबडे – ६०० मी . प्रथम , ८० मी . अडथळा प्रथम , करण ठाणगे – लांब उडी – प्रथम , २०० मी -द्वितीय ,साई खोले – गोळा फेक – प्रथम ,पायल लामखडे – लांब उडी -प्रथम , ६०० मी . तृतीय ,तेजस्विनी ताम्हाणे – लांब उडी – द्वितीय ,वैष्णवी वाखारे – ८० मी अडथळा -द्वितीय ,
सायली शेळके – गोळा फेक – तृतीय
१७ वर्ष वयोगट:-
शुभम पवार – १५०० मी – प्रथम , ३००० मीटर प्रथम , ४०० मी अडथळा – प्रथम ,रुद्र लोखंडे – लांब उडी – प्रथम , तिहेरी उडी – प्रथम , ४०० मी अडथळा – द्वितीय , अथर्व ढवळे – लांब उडी – तृतीय , तिहेरी उडी – द्वितीय ,ओम यादव – ११० मी अडथळा – प्रथम , समिक्षा वाळुंज – लांब उडी – प्रथम , तिहेरी उडी – प्रथम , १०० मी अडथळा – प्रथम , साक्षी बनकर – ४०० मी अडथळा – द्वितीय ,गोळा फेक – तृतीय
१९ वर्ष वयोगट : –
प्रतिक भालेकर – लांब उडी -प्रथम , ११० मी अडथळा – तृतीय ,रोहन यादव – तिहेरी उडी – प्रथम
,आदित्य गुंजाळ -क्रॉसकंट्री – तृतीय क्रमांक ,वैभव कोकाटे -क्रॉसकंट्री – चौथा क्रमांक ,प्राजक्ता पवार- लांब उडी -प्रथम , तिहेरी उडी – प्रथम , ४०० मी अडथळा – प्रथम ,श्रृती खोले- तिहेरी उडी – द्वितीय , ४०० मीटर , २०० मी-द्वितीय , श्रेया पठारे -११० मी . अडथळा -प्रथम ,साक्षी जाधव – लांब उडी – तृतीय ,
प्राजक्ता मोहळकर – गोळा फेक -तृतीय
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक संदीप घावटे , अमोल कातोरे , सतीश झांबरे , सतीश कौठाळे , लक्ष्मण आयरे ,सोनाली शेळके , कांता मांडगे , वंदना गायकवाड ,सुजाता पठारे यांचे मार्गदर्शन लाभले .
शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा ,सचिव नंदकुमार निकम, शाळा समितीचे अध्यक्ष चंदुलाल चोरडिया, मुख्याध्यापक विशाल डोके , पर्यवेक्षक नामदेव डुंबरे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .