खेळात करीअरची संधी शोधावी- प्राचार्य बी बी अंबाडे


प्रवरानगर येथे जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धा संपन्न

अहमदनगर , ता. २ :विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे विशेष लक्ष द्यावे. खेळाकडे करिअरची एक वेगळी व शाश्वत संधी म्हणून पहावे असे आवाहन प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.बी बी अंबाडे यांनी केले .
प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर येथे Ahmednagar District Athletics Association द्वारे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास ११०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. १४, १६, १८, २० व २३ वर्ष वयोगटासाठी या स्पर्धा झाल्या .या स्पर्धेतील प्रथम दोन क्रमांक प्राप्त खेळाडू १९ ते २२ सप्टेंबर दरम्यान बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याचे सचिव दिनेश भालेराव यांनी सांगितले .
या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था अध्यक्ष तथा पालकमंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील व सीईओ डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी शाळेचे मैदान व क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले.
स्पर्धेसाठी पंच म्हणून क्रीडा शिक्षक रमेश वाघमारे, रमेश दळे, दिपक जाधव,राहुल काळे, प्रतीक दळे, किरण कडस्कर, अतुल डे, संदीप घावटे, सुजित बाबर, श्रीरामसेतु आवारी, कैलास शेळके, बापूसाहेब गायकवाड, अजित पवार, समीर शेख, कबीर शेख, अनिल पिंपळे, चांडे सर , जाधव सर, अमित चव्हाण , गुलजार शेख , विश्वेशा मिस्किन, नेहा मोरे , साक्षी मोरे यांनी काम पाहिले.