श्री क्षेत्र देवगड येथे येत्या १७ डिसेंबर रोजी ११११ कुंडात्मक यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त देवस्थान देवगड यांच्या सहकार्याने केडगाव (अहिल्यानगर ) येथील सदगुरु शंकर महाराज मठाच्या वतीने हा महादत्त यज्ञ सोहळा होणार आहे. त्यासाठी तेथील तयारी पुर्ण झाली आहे.
या यज्ञ सोहळ्याच्या तयारीसाठी नुकतीच दत्त देवस्थान देवगडचे प्रमुख भास्करगिरी महाराज व शंकर महाराज मठ केडगावचे प्रमुख अशोक महाराज जाधव यांची बैठक झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात दत्तयज्ञ सोहळा देवगड येथे पहिल्यांदाच होत असून, त्याची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. देवगड हे उर्जात्मक तिर्थक्षेत्र म्हणून पुढे आले आहे. तेथे हा यज्ञ सोहळा होत असल्याने दत्त देवस्थानचे अधिकारी, कर्मचारी, सेवेकरी व शंकर महाराज मठाचे प्रमुख व सेवेकरी नियोजन करीत आहेत.
केडगाव येथील शंकरमहाराज मठाच्या वतीने आत्तापर्यंत एक हजार ३३१ (१३३१) यज्ञांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक विधी करतानाच विज्ञानाची साथ देण्याचा प्रयत्न मठाधिपती अशोकमहाराज जाधव यांचा आहे.
सदगुरु शंकर महाराज मठाच्या वतीने मे २०२३ मध्ये नारायणबेट (पुणे) येथे एकाचवेळी एक हजार १११ यज्ञांचे आयोजन केले होते. त्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्येही झाली आहे. त्यानंतर अधिक मास व श्रावण या हिंदू संस्कृतीमधील दोन पवित्र महिन्यांमध्ये जाधव यांच्या संकल्पनेतून श्रीगोंदे, केडगाव, कर्जत, पिंपळगाव लांगडा फाटा, पळसदेव (इंदापुर), सोलापुर, मायंबा (आष्टी), कराड या ठिकाणी यज्ञांचे आयोजन झाले. याच गणेशयाग, विष्षूयाग व दत्तयाग प्रामुख्याने करण्यात आले. त्यामाध्यमातून त्याभागातील हवेचे शुध्दीकरण करण्यासाठी मदत झाली.
हिंदू धार्मिक विधींमध्ये देवी, विष्णू, गणेश, दत्तात्रय यांसारख्या देवतांना उद्देशून याग केले जातात. त्या त्या देवतांना प्रिय असलेल्या द्रव्यांचे हवन या यज्ञात केले जाते. व्यक्तीप्रमाणेच समाजाचे कल्याण हाही हेतू धरून याग आणि होम हवन केले जाते. हवन केल्याने सकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो. अनेक अभ्यासांनूसार, हवन केल्याने प्रदूषणमुक्त वातावरण मिळत असल्याने आरोग्य सुधारते. धार्मिक शास्त्रानुसार, वाईट घटनांना टाळण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी हवन केले जाते.हवनात बेलपत्र, कडुलिंब, कलिंगज, आंब्याचे लाकूड, पिंपळाची साल, कापूर, मोदक, जव, तांदूळ, चंदनाचे लाकूड इत्यादी सामुग्रीला अग्नित टाकले जाते. यज्ञातून निघणाऱ्या धुराने वातावरणातील शुद्धता वाढत असल्याने हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हवनात गावरान शेणाच्या गोवऱ्यांचा वापर होत असल्याने ९४ टक्के बॅक्टेरिया नष्ट होतात असा शास्त्रिय आधारही पुढे आला आहे.अनेक जण मन:शांतीच्या शोधात असतात यज्ञादरम्यान मंत्रांच्या जपामुळे कंपन निर्माण होते.
देवगड येथील दवस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या यज्ञ सोहळ्यात महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक सहभागी होत आहेत. स्थानिक भाविकांनीही यात सहभागी व्हावे.
अशोकदादा जाधव, मठाधिपती, सदगुरु शंकर महाराज मठ केडगाव.
दत्तयागसाठी येणाऱ्या भावीकांसाठी महत्वाच्या सूचना….
*श्री शंकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली दि 17/11/24 रोजी देवगड येथे 1111 कुंडात्मक महादत्तयाग हवन पुजा साठी सोबत येताना घेऊन यावयाची साधन सामग्री पुढील प्रमाणे..
1) बस्कर(आसन)-2
2)तांब्याचं ताट -1
3)तांब्याचा तांब्या -1
4)वाट्या -2
5)चमचे -2
6) गावरान गाईचे तुप
7) साखर अर्धा किलो
8) खोबऱ्याची 1 वाटी9) पांढरे तीळ 1 किलो
10) महाराजांसाठी हार फुले प्रसाद 🔱🚩🔱
🙏🏻सकाळी ७.३० च्या आत देवगड येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती..
८.०० वा पुजा सुरू होईल..
महत्वाची सुचना– आपला पेहराव हा पारंपारिकच असावा जसे की पुरुषांनी सोहळे उपरणं परिधान करावे स्त्रियांनी साडी परिधान करने आवश्यक आहे
…आपल्याकडे गायीचे तुप घरचे असेल तर उत्तम पण नसेल तर यज्ञस्थळी तुप मिळेल.
टीप:- वरील सेवा ऐच्छिक आहे.
संपर्क:-८४३२०८१३१३
🌹 जय शंकर 🌹
व्हॉट्स अप ग्रुप वर सहभागी होण्यासाठी खालील लिंक आहे..